1
 


GhantaShailesh Kale
Director


Movie Review
Ghanta:मॅड कॉमेडीचा घंटा


CAST: Ameya Wagh, Aroha Velankar, Saksham Kulkarni, Kishor Kadam, Pushkar Shrotri, Murli Sharma, Anuja Sathe Gokhale
Screenplay : Sumit Bonkar & Rahul Yashod
Dilouges : Fransis Augustine & Vinod Jadhav
Director : Shailesh Shankar Kale

मॅड कॉमेडी हा प्रकार बॉलिवूडमध्ये गाजत आहे. हा प्रकार काही अंशी मराठी सिनेमात वापरला जातो. घंटा हा असाच मॅड सिनेमा आहे. तारुणांना साद घालणारा साधा सरळ विनोदी अंगाने जाणारा विषय. अशा सिनेमांना जी ट्रिटमेंट दिली जाते, तिचा वास्तवाशी प्रत्यक्षात संबंध नसतो. घटना जाणून बुजून घडवल्या जातात. क्या कूल है हम, हेरा फेरी हे चित्रपट मॅड कॉमेडी आहेत. पण घटना जाणून बुजून घडवल्या असल्या तरी त्याला विनोदी अंगाने का होईना, पण लॉजिक असलं पाहिजे आणि अर्थात विनोद केवीलवाणा वाटता कामा नये. 

राज (अमेय), अंगद (आरोह), उमेश (सक्षम) हे तिघे बेरोजगार मित्र क्रिकेटवर सट्टा लावून पैसे कमवतात. चिंत्या (किशोर कदम) बेकायदेशीरपणे बेटिंगचं रॅकेट चालवतो. एकदा तिघेही बेटिंगमध्ये पाच लाख रुपये हरतात. चिंत्या त्यांना एक आठवड्याची मुदत देतो. दुसरीकडे दिघ्या (पुष्कर श्रोत्री), जो राजकारणात येऊ पाहतोय त्याचं एक पार्सल चुकून अंगदच्या प्रेयसीच्या बॉसकडे (मुरली शर्मा) जातं आणि  हे दोन प्रकरण मिश्रित होतात. या गोंधळातून घडणारं नाट्य़ म्हणजेच घंटा. 

घंटा हा सिनेमा विशेषतः आजच्या मॉडर्न तरुणाईला समोर ठेवून बनवला आहे. मध्यांतराच्या आधीचा भाग खुपच रटाळ झाला आहे. कॅरेक्टर इंट्रोडक्शनसाठी खुप वेळ वाया घालवला आहे. हे इंट्रोडक्शन प्रसंगातून दाखवता आलं असतं. विनोद निर्मितीचा अट्टाहास करण्य़ात आला आहे. राज हा लेडी किल्लर आहे, अंगद डबिंग आरटिस्ट आणि उमेश सॉफ्टवेअरचा किडा आहे. अंगदची भूमिका करणारा आरोह डबिंग आरटिस्ट वाटतो. पण सक्षम सॉफ्टवेअरचा किडा मुळीच वाटत नाही आणि अमेय लेडी किल्लर वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी तिघांनी त्यांना दिलेला रोल चोख केला आहे. पूर्वार्धात कथा रखडते पण उत्तरार्धात सिनेमाला गती मिळते. पूर्वार्ध जरा वेगाने आणि घटना घडत गेला असता तर मजा आली असती. सिनेमात अनेक प्रसंग विनोदनिर्मिती करण्यासाठी उगाच घातलेले आहेत. असो. किशोर कदम, पुष्कर श्रोत्री, मुरली शर्मा, शिवानी सुर्वे, विजू खोटे अशा कलाकारांचं काम चांगलं झालं आहे. त्यात अमेय, आरोह आणि सक्षमसारखे चांगले तरुण कलाकार आहेत. त्यामुळे परफॉर्मेन्सच्या बाबतीत सिनेमा आपल्याला नाराज करत नाही. 

चित्रपटातील गाणी तरुणांना साद घालणारी आहेत. शैलेश काळेंचं दिग्दर्शनही बरं झालं आहे. मध्यांतर नंतरची पटकथा चांगली लिहिली आहे. फक्त काही प्रसंग उगाच विनोदी केलेले आहेत आणि या प्रसंगांना दिलेलं विनोदी पद्धतीचं पार्श्वसंगीत असं सूचित करतं की आता प्रेक्षकांनी हसायला पाहिजे. हे जरा अति झालंय. सिनेमा मॅड कॉमेडी असल्यामुळे आणि इललॉजिकली कथा पुढे जात असल्यामुळे सिनेमातील प्रसंगांवर भाष्य करणार नाही. कथा फार वेगळी नाहीच. संवाद ठीक आहेत. पण एकंदर सिनेमा बरा आहे. सविस्तर लिहिण्यासारखं विशेष काही नाही. या सिनेमाला आपण अडीच स्टार्स देऊ.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
www.jayeshmestry.in    जयेश शत्रुघ्न मेस्

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at www.prabodhakformumbai.in AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist.

Click here to Top