1
 


बाबांची शाळा
चाट मारायला हरकत नाही


आर विराज
दिग्दर्शक


Movie Review
बाबांची शाळा:You may bunk this School!


बाबांची शाळा
"चाट मारायला हरकत नाही" 

 दिग्दर्शक - आर. विराज   

पटकथा - पराग कुलकर्णी

संवाद - पराग कुलकर्णी

कलाकार -  सयाजी शिंदे, शशांक शेंडे, ऐश्वर्या नारकर, कमलेश सावंत, छाया कदम, आरती मोरे, कार्तिक चव्हाण, उमेश बोळके, मिलिंद अधिकारी, गौरी देशपांडे

सध्या सत्य घटनेवर सिनेमा काढण्याचे टुम आले आहे. हिंदी चित्रपट तर हल्ली सत्य घटनेने व्यापलेले आहेत. याच पार्श्वभुमीवर आयडिया एन्टरटेन्मेंट निर्मितीसंस्थेचा बाबांची शाळा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कैद्यांच्या भावविश्वावर आधारीत असल्यामुळे याची तुलना "दो ऑंखे बारह हाथ" करण्यात आली होती. परंतु कैदी आणि कैंद्यांच्या भल्यासाठी झटणारा जेलर हा एक भाग सोडला तर या दोन चित्रपटात फरशी समानता नाही. 

एक वेगळा विषय जरी या चित्रपटात मांडण्यात आला असला तरी चित्रपटाची मांडणी फारशी नीट झालेली नाही. १४ मिनिटांच्या रागावर ताबा न मिळवू शकल्याने महिपतला १४ वर्षांची शिक्षा होते व नंतर त्याला पश्चाताप होतो. पण वेल निघून गेलेली असते.  आपल्या गुन्हाची शिक्षा भोगणारा महीपत घोरपडे, त्याची मुलगी सोनाली, तुरुंगाधिकारी श्रीकांत जमदाडे आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता साटम या चार मुख्य पात्रांभोवती सबंध कथानक फिरतं. पण ही कथा केवळ महिपाटची नसून इतर चार कैद्यांचीही आहे. बाबू, इक्बाल, कुंदन, मुकुंद हे महिपतप्रमाणेच स्वतःच्या रागावर ताबा न मिळवू शकलेले कैदी आहेत. ते सराईत गुन्हेगार नाही. सयाजी शिंदे यांनी जेल अधिकार्‍याची भुमिका निभावली आहे.

चित्रपटाचा विषय मराठीसाठी नवीन असला तरी अनेक प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. कैद्यांना सुधारणे हा महत्वाचा विषय आहे. परंतु प्रत्येक कैद्याच्या बाबतीत हे शक्य आहे का? आरोपींना सार्वजनीक ठिकाणी घेऊन जाणे हे धोकादायक नाही का? कैद्यांना सुधारण्याचा वीडा दो ऑंखे बारह हात या चित्रपटाचा नायक उचलतो. पण बाबांची शाळा या चित्रपटातही जेलरला हेच वाटत असते. पण ते वाटते हे सांगता आलेले नाही. फारसा विचार न करता अधिक भाष्य करण्यात आलं आहे. महिपतची बाजू मजबूत करण्यासाठी तो कवी मनाचा आहे. त्याला वाचायला आवडते, त्याचं मुलीवर व बायकोवर प्रेम असतं वगैरे व्यवस्थित दाखवलंय. पण हे एवढं कारण पुरेसं वाटत नाही. म्हणून चित्रपटातल्या अनेक गोष्टी आपल्याला खटकतात. 

ऐश्वर्या नारकर, शशांक शेंडे व सयाजी शिंदे यांनी उत्तम काम केले आहे. विशेषतः सयाजी शिंदे यांचे काम फारच छान झाले आहे. तरीही यामुळे सिनेमाची बाजू भक्कम होत नाही. शेवटपर्यंत बर्‍याच गोष्टी खटकत राहतात. मुख्य म्हणजे ही कथा महिपतची आहे की पाच कैद्यांची हे कळत नाही. असो. तरीही मराठीच नवनवे प्रयोग होत आहेत हे चांगले लक्षण आहे. महिपतसारखा चांगला माणूस आपल्या पत्नीचा खून का करतो? त्याला आपल्या रागावर ताबा का मिळवता येत नाही. अनावधानाने केलेल्या गुन्ह्यासाठी झालेली शिक्षा मिळाल्यामुळे एखाद्या सज्जन माणसाच्या मनावर काय परिणाम होतो हे शशांक शेडे यांनी उत्तमरीत्या दाखवले आहे. एक वेगळा प्लॉट म्हणून हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. आपण या सिनेमाला २ स्टार्स देऊ.

 

Jayesh Mestry

www.jayeshmestry.in 

www.mestrysolutions.in 

www.prabodhakformumbai.in

    Jayesh Mestry

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at Sahitya Upekshitanche AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist..

Click here to Top