1
 


Guru
मसालेदार आणि फिल्मी


आशिष पाथरे
लेखक


संजय जाधव
दिग्दर्शक


Movie Review
गुरु:परत एक पाउल Bollywood कडे


मसालेदार फिल्मी "गुरु"

 

दिग्दर्शक : संजय जाधव

पटकथा, संवाद : आशीष पाथरे

कलाकार : अंकुश चौधरी, उर्मिला कोठारे, मुरली शर्मा, अविनाश नारकर, रवींद्र मंकणी

 

चित्रपटात एक हिरो असतो, एक हिरोइन आणि एक व्हिलन. व्हिलन हिरोला त्रास देतो आणि हिरो व्हिलनचे सगळे डावपेच अपयशी करतो. अखेर सत्याचा विजय होतो. हिरो जिंकतो आणि प्रत्येक रील मध्ये हारत आलेला व्हिलन शेवटच परत एकदा हरतो.
हे सर्वसाधारण कथानक अनेक चित्रपटात असतं. आणि दक्षिण भारतीय चित्रपट श्रुष्टीत तर बहुतेक असतंच. गुरुही तसाच एक तेलुगु छाप मारलेला मराठी सिनेमा आहे. मराठी सिनेमाची ‘दुनियादारी’ पासून Bollywood कडे सुरु झालेल्या वाताचालीतलेच ‘गुरु’ हे एक पाउल किंवा गुरु च्या style मध्ये म्हणाव तर High Jump, काय समजलं नाय?

 

एक छोटसं गाव. गावातले लोक सुखाने नांदत असतात. त्यांच्या सुखाला मानसिंगची (मुरली शर्मा) नजर लागते. मानसिंग हा स्थानिक आमदार, उद्योगपती व गुंड आहे. मुंबईतल्या एका बड्या उद्योगतीला या गावात मेगासिटी उभी करायची असते. त्याला मानसिंगची साथ असते. याला विरोध करतो गावातील कर्तृत्ववान माणूस माधव (अविनाश नारकर). म्हणून माधवला रस्त्यातून हटवलं जातं. तो सुदैवाने बचावतो. पण तो आपली शुद्ध हरपून बसतो. आता गावाच्या भल्यासाठी माधवचा भाऊ गुरु (अंकुश चौधरी) मानसिंगसमोर भिंत बनून उभा राहतो. जो मुंबईत राहत असतो व काही लफड्या मुळे पोलिसांपासून पळून गावात आला आहे. जर लपायला आला आहे तर सामोरे जावून भांडण का करतो अशे फालतू प्रश्न अश्या सिनेमांमध्ये विचारत नसतात.
आता काय, सुरु होते ऍक्शन... पण नुसती ऍक्शन काय कामाची
? थोडा रोमान्सही हवाय. तो हि होतो एकदम Bollywood/Tollywood/Anywood पद्धतीने.
गावात गुरुला मॅंगोडॉली भेटते (ऊर्मिला कोठारे). हिरोइन हिरोला लगेच पटत नाही. आधी दोघांचं लाडीक भांडण होतं. हिरो पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडतो. हिरोइनला आधी वाटतं की हा कुणीतरी रोडछाप रोमिओ आहे. पण हिरो ज्याप्रकारे गावकर्‍यांसाठी झुंज देतो
, ते हिरोइनला आवडतं आणि सिनेमाच्या नियमाप्रमाणे हिरोइन सुद्धा हिरोच्या प्रेमात पडते. या दरम्यान गुरु गावकर्‍यांचा विश्वास मिळवतो व मानसिंगचे प्रत्येक डावपेच उलथवून लावतो. अशी साधारण गुरुची कथा आहे.

 

गुरु हा पुर्णपणे मसाला सिनेमा आहे. यात ऍक्शन आहे, रोमान्स आहे, कॉमेडी आहे, ट्रॅजेडी आहे, डान्स आहे. सगळ्या कलाकारांनी आपली भुमिका चांगली पार पाडली आहे. स्त्रीचं सौंदर्य दाखवण्यासाठी तिला परकर व पोलक्यात दाखवण्याची संजय जाधव यांची तेलुगु चित्रपटा सारखी कल्पना ऊर्मिलावर खुपच सुंदर दिसली आहे. पण यात यांनी कुठेही अश्लीलता येऊ दिली नाही. म्हणून हा सिनेमा कंम्पीट फॅमेली पॅक आहे. हिंदी किंवा साऊथच्या चित्रपटा सारखी एक विशिष्ट स्टाईल सुद्धा अंकुश चौधरीला देण्यात आली आहे व ती त्याला शोभली पण आहे. गुरु हा मॅचो मॅन आहे. त्यामुळे त्याच्यासमोर कितीही बलदंड शत्रू आले तरी तो सगळ्यांना धू धू धूतो. सिंघम, खिलाडी ७८६ वगैरे सारखे अनेक स्टंट्स आहेत. अंकुशने मारलेले फिल्मी डायलॉग प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतात. मराठीतला डॅशींग हिरो अशी अंकुशची इमेज या चित्रपटामुळे अधिक जाणवते. ओवीच्या भुमिकेतील मॅंगो डॉली ऊर्मिला नेहमीप्रमाणे सुंदर दिसली आहे. तिची भुमिका उत्तम झाली आहे. सबंध चित्रपटात लक्षात राहतो तो म्हणजे चित्रपटाचा व्हिलन मानसिंग अर्थात मुरली शर्मा. मराठी भाषिक नसतानाही त्यांचे मराठी उच्चार खुप स्पष्ट ऐकू येतात. साऊथच्या टिपिकल व्हिलनसारखी ही भुमिका आहे आणि ती मुरली शर्मा यांनी उत्कृष्टपणे निभावली आहे. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन सगळं काही फिल्मी असल्यामुळे उगाच आपण लॉजिक लावण्यात काहीच अर्थ नाही. मानसिंग हा आमदार असूनही तो गुंडासारखा वागतो. रस्त्यावर आनंदाने नाचतो. आमदार असे नसतात. पण या चित्रपटाला हा किंवा कुठलाच लॉजिक लागू होत नाही. 

 

अविनाश नारकर, ज्योती चांदेकर, स्नेहा रायकर, रवींद्र मंकणी या सर्वांनी आपल्या अभिनयाने चित्रपटात प्राण ओतला आहे.

 

नटसम्राट, कट्यार काळज्यात घुसली, या चित्रपटांनी इतर भाषीय प्रेक्षकांना मराठी सिनेमा कडे ओढले तर गुरु हा सिनेमा मराठी प्रेकशांना परत Bollywood OD देणारा चित्रपट.  

आता हीच जर सामान्य मराठी प्रेक्षकांनी नाडी असेल तर ती संजय जाधव यांना सापडली आहे. मराठीमध्ये असे अवैचारिक चित्रपट फार बनत नाही. पण संजय जाधव यांनी ही परंपरा मोडीत काढली आहे. प्रेक्षकांच्या डोक्याला फारसा त्रास न देता फक्त मनोरंजन करणं हे जाधवांचं धोरण असावं. तुम्हाला जर लॉजिकल चित्रपट बघायला आवडत असतील तर हा चित्रपट कदाचित तुम्हाला आवडणार नाही. पण रावडी राठोड, सिंघम असे चित्रपट तुम्हाला आवडत असतील तर गुरु हा मराठी चित्रपट त्याच प्रकाराचा एक मराठी पर्याय आहे. डोकं बाजूला ठेवून सिनेमागृहात प्रवेश करा आणि फक्त मनोरंजन म्हणून सिनेमा पहा Bollywood चा तो प्रकार आता मराठीत सुरु झाला आहे. असे समजून या सिनेमाला आपण तीन स्टार देऊया.

 

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

 

Jayesh Mestry

9967796254

 

www.jayeshmestry.in 

www.mestrysolutions.in 

www.prabodhakformumbai.in

    जयेश मेस्त्री

Advisory Panel Member – Censor Board (CBFC), Copywriter at ‘Agencydigi’, Sub-Editor at Sahitya Upekshitanche AND Translator, Lyricist, Poet, Screenwriter. Public Speaker, Columnist, Analyst, Director, Theatre Artist..

Click here to Top