1
 


शेगावीचा योगी गजानन
प्रयत्न चांगले त्रुटी पण चांगल्य


पिताम्बर काळे
दिग्दर्शक


नितिन नायगांवकर
कथा


Film Review
शेगावीचा योगी गजानन :प्रयत्न चांगले त्रुटी पण चांगल्याच


मराठी  चित्रपट समीक्षा                                                       

शेगावीचा योगी गजानन 
श्रींचा महिमा आणि समकालीन अवशेष

प्रयत्न चांगले त्रुटी पण चांगल्याचsurprise

कथा        :     नितीन नायगावकर

पटकथा    :     दीपक मोरे

संवाद       :     आबा गायकवाड

गीत         :     प्रवीण दवणे

दिग्दर्शन   :     पितांबर काळे

शेगावीचा योगी गजानन ह्या चित्रपटाची मूळ कथा खरी आहे, मागील शंभर दीडशे वर्षा आधीच्या काळात घडलेली आहे. त्या कथेला सिनेमाचे रूप देण्यासाठी पटकथेची चांगली मांडणी चित्रपटात केलेली असल्याचे दिसून येते.

शेगाव मध्ये २३ फेब्रुवारी १८७८ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास गावातील एका कार्याक्रमात जेवाणाच्यापत्रावळीतील शिते वेचून खाताना श्री गजानन महाराज बंकटलाल  अग्रवाल नावाच्या एका श्रीमंत माणसाला आणि पितांबर शिंपी यांना दिसतात ..ते योगी असल्याचे त्यांना लक्षात येते. शेगावातच राहून आगळे वेगळे चमत्कार / महिमा महाराज करतात ..तसेच महाराजांचे भ्रमण हि सुरु असते , गावकरी महाराजांच्या छत्रछायेखाली गुण्या गोविंदाने राहू लागतात. भास्कर नावाच्या शेतकऱ्याने श्रीं ना एक घोट भर पाणीदेण्यास नकार देताच  श्रीं नी कोरड्या विहिरीत पाणी आणले . नदीच्या पात्रात बोट बुडत असताना नर्मदा मातेला प्रसन्न केले ,पिताम्बरचे भक्तपण राखण्यासाठी  सुकलेल्या झाडाला पाने येतात / हिरवळ फुटते. गावचे पाटील श्रीं ना ऊसाने मारतात आणि त्याच उसाला हाताने  पिळून माउली त्यांना उसाचा रस पाजतात. ते खरेच अंतर्यामी  आहेत. त्यांना पंच वेदांचे  देखील ज्ञान आहे, अत्यंत हुशार, अभ्यासू ,तज्ञ व्यक्तीमत्व श्री गजानन महाराज वैकुंठ मार्गस्थ होतात हे देखील त्यांना माहिती असते ..हे खरे योगी आहेत यात तीळमात्र शंका नाही. श्रीं च्या खूप साऱ्या महिमांची श्री गजानन महाराजांची हि कथा आहे . “ज्याने विश्वास गमावला त्याने श्वास गमावला” अशा प्रकारचे संवाद महाराजाच्या मुखातून वेदासारखे येतात ....

हि कथा उत्तम प्रकारे मांडल्या गेली आहे. गजानन महाराजांच्या संवादावर काम केले गेले हे दिसून येते पण इतर छोट्या छोट्या पात्रांच्या संवादावर कुठ्लेच काम केल्या गेलेले  नाही. अक्षरशः नाटकीपणा दिसून येतो बोलण्यात. काही संवाद तर अतिशय पोकळ वाटतात .

विदर्भातील बोलीभाषेवर विशेष भर दिल्या गेलेला नाही. शब्द उच्चारतांना फक्त तसा आव आणला गेलाआहे . पटकथा आणखी दमदार झाली असती. आणखी संघर्ष हवा होता. सुरुवाती पासूनच समकालीन पटकथेत निर्मिती साठी घाई झाल्याचे जाणवते. वेशभूषेच्या नावावर दुकानातून कपडे सरळ पात्रांना परिधान करण्यास दिले असे लक्षात येते व अतिशय हौशीपणा दिसून येतो. सर्व पात्रे पांढरे शुभ्र  झगझगीतदिसतात. कला दिग्दर्शना  मध्ये काळ क्लीक झालाच नाही मुळी. बऱ्याच उणीवा होत्या. रंग भूषा पण भडक होती ,

छोटी –छोटी स्थळे देखील अभ्यासपूर्ण करायला हवी होती. दिग्दर्शन अपेक्षे पेक्षा कमी पडले. चित्रपटातील काहीच पात्रांचा अभिनय उत्तम होता.  मुख्य पात्र गजानन महाराजाची भूमिका करणारे “मुकुंद वसुले ”यांनी आपली भूमिकेला खूप छान पार पाडली. बाकी मिलिंद  गुणाजी , संजय खापरे ,भारत गणेशपुरे , प्रेमा किरण , जैकी श्रॉफ , दिपाली सय्यद , पूनम विणेकर ,प्रज्ञा माहेश्वरी, यांनी सुद्धा आपआपल्या भूमिकेला न्याय दिला. विठोबा घाटोळ यांनी किशोर बळीचे  पात्र उत्तम प्रकारे रंगविले आहे. चित्रपटाचे गीत आणि संगीत मंत्रमुग्ध करणारे आहे.

चित्रपट बनविण्याचा प्रयत्न आवडणारा आहे पण तांत्रिक उणीवा बऱ्याच होत्या निर्मात्याने  आणखी  सृजनशील होऊन काम करायला हवे होते.

 

समीक्षक  -

संतोष जढाळ.

 

 

 

 

    संतोष जढाळ

संतोष जढाळ मराठी रंगमंचाचे कलाकार, कथाकार व नेपत्थ्यकार असून हे जवळ जवळ सर्वच मराठी चित्रपट बघतात .

Click here to Top