प ……प प्रेमाचा – मैनुद्दीन जमादार

प ……प प्रेमाचा

घरात असणारी शांतता समीर ला आता आवडू लागली होती. माहित नाही मागील किती दिवसापासून त्याने घर सुद्धा झाडले नव्हते. स्वतः कधी नुसता सकाळी उठायला उशीर जरी झाला तरी आरडा ओरडा करणारा समीर हल्ली सूर्याच्या तापट सड्यांच्या चटक्याने उठत होता. हो…,एवढा बदलला आणि स्वताला दुनियेपासून वेगळ ठेवण्यासाठी घरात कैद होणारा समीर सगळ्यांच्या स्मरणातून काहीसा गायबच झाला त्याला कारणही तस्सच होत. पण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टींना आपण कितपत महत्व देतो यावरून  आपल्यातील बदल आपोआपच दिसून येतात त्याला दुसर काही दाखवायची किंवा बदलायची गरज पडत नाही. > नेमक तसच काहीस समीरच्या आयुष्यात झालेलं असाव …… > प्रत्येक सकाळी उशिरा उठणारा समीर आज सूर्याच्या उठण्यापुर्वीच उठला होता. घर तसच होत जस आधी असायचं. कपडे विस्कटलेले, भांडी पडलेली , पेपर चा थर ना थर साचलेला आणि अशा अवस्थेत  सकाळी फक्त समीर वाचत बसलेल्या पेपरचा वाऱ्यामुळे येणारा आवाज एकू येत होता आणि त्याच आवाजात घरात असणारी ती शांतता हरवून गेली होती.आणि याच हरवलेल्या क्षणात अचानक दरवाज्याची बेल वाजली, एवढ्या दिवसापासून कोणी फिरकले नाही आणि आज सकाळी सकाळी कोण आले म्हणून समीर लगेचच दरवाजा उघण्यासाठी उठला. दरवाजा उघडला आणि … समीर च्या चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य उमटले जणू कि काय कोमेजलेल कमळ पुन्हा फुलले. आणि आता मला पण कोण होत त्या दरवाज्यावर याची उस्तुकता लागलेली कि ज्यामुळे हा समीर आज चक्क हसला..  हां….. ती स्पृहा होती . स्प्रुहाचा चेहरा पाहून समीर चा आनंद क्षितीजापलीकडे जाऊन पोहचलेला. दारात उभी असणारी स्पृहा काही न सांगताच सरळ आत आली  आणि काही कळायच्या आत तिने काहीतरी शोधाशोध सुरु केली.समीर मात्र  फक्त बघत होता. स्पृहा तू आताच आली किती दिवसांनी जरा बस , जरा बोल आणि मग शोध तुला जे पाहिजे ते आणि घर अजूनही जसच्या तसेच आहे काहीही हलवले नाही मग तर तू ठेवलेली वस्तू तुला लगेच सापडेल. जशी तू गेलीस तुझ्या प्रत्येक त्या आठवणी तश्याच आहेत आणि आता तर काय विस्कटलेल घर हेच माझ्या  सोबत असतात. समीरच्या या बोलण्याने स्पृहाचे काळीज हेलकावले आणि क्षणात तिच्या डोळ्यात अश्रुंचे ढग जमा झाले आणि समीरच्या पुढे कस रडायचं म्हणून चहा बनवण्याच्या बहाण्याने स्वयंपाक घरात जाउन ढसाढसा रडू लागली. तीच रडण समीर ला कळत होत आणि तिच्या मनात असणार प्रेम अजूनही तसच होत हे त्याला माहित होत. चहात साखर किती घेणार म्हणून स्पृहाने आतून आवाज दिला, आणि आज जरा गोडच कर म्हणून हट्ट करणारा समीर हा त्याच्या दररोजच्या कडू आयुष्याला विसरण्यासाठी जरासा विसावा शोधत होता. स्पृहाचे अश्रू थांबेनात पण वेळ आता बरीच झाली म्हणून चहाचा कप घेऊन बाहेर समीर च्या नजरेला डावलून शांत बसली. समीर पूर्ण वेडा झाला होता पण त्याला वेड लावणारी स्पृहा सुद्धा आयुष्याला सावरण्यासाठी स्वताला सावरत होती. तिला जे पाहिजे ते बहुदा तिला सापडले होते म्हणूनच हातात काहीतरी घेऊन ती बसली होती. समीरच्या कितीही विचरण्यावरही तिने काहीच सांगितले नाही. चहा संपला चहाची चव जिभेवर रेंगाळत होती तोपर्यंत स्पृहाने जाण्याचा निर्णय घेतला अन समीरचे तोंड पुन्हा हिरमुसले. क्षणभर अजून थांब असा आग्रह करणारा समीर पूर्ण असफल राहिला अन  काही कळायच्या आत स्पृहा घरातून जाण्यासाठी उठली. अश्रू अजून रेंगाळत होते अन काळीज बंद पडले होते. तिने अजूनही काहीच सांगितले नव्हते पण जाता जाता तिच्या हातात दोघांच्या  घटस्पोटाचे डॉकुमेंट होते जे मागच्या किती दिवसापासून धूळ खात तसेच पडले होते जशी ति या घरातून गेली. त्याच वेळी क्षणभर सगळ सुन्न,काळीज बंद, अन अश्रूंनी डोळ्यांचीही साथ सोडली. आज समीर अन स्पृहा वेगळे झाले पण माहित नाही मनाने ते अजून किती दूर झालेत. काहीश्या शुल्लक कारणांनी  वेगळ होण्याची हि रीत खरच नकोशी आहे पण समाजमान्य घेतलेला दुरावा अशा प्रेमाला खरच दूर लोटू शकत नाही. आता फक्त जगण्यासाठी सोबत आहेत अश्रू आणि त्यासाठी लागणारी आठवण.

मैनुद्दीन जमादार
म्हसवड, सातारा
8446842384

mainuddin.jaid@gmail.com

This entry was posted in Members Contributions, Members' Creations and tagged , . Bookmark the permalink.